प्रसिद्ध दिग्दर्शक कुमार सहानी यांचे निधन, वयाच्या 83 वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रसिद्ध सिनेनिर्माते कुमार सहानी यांचे कोलकाताच्या रुग्णालयात निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

कुमार सहानी यांचे शनिवारी रात्री 11 वाजता अल्पशा आजाराने कोलकाता येथील रुग्णालयात निधन झाले. ते आजारी होते आणि त्यांची प्रकृतीही खालावत चालली होती.  कुमार साहनी यांनी ‘माया दर्पण’, ‘चार अध्याय’ आणि ‘कसबा’ या सिनेमांचे दिग्दर्शन केले होते. कुमार साहनी यांचा जन्म 1940 मध्ये हिंदुस्थानातील सिंधमधील लारकाना येथे झाला. साहनी यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. हिंदुस्थानी सिनेसृष्टीतील आणखी एक मोठे व्यक्तिमत्त्व मणि कौल यांच्यासोबत पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) येथे शिक्षण घेतले होते. कुमार साहनी यांनी ‘माया दर्पण’, ‘चार अध्याय’ आणि ‘कसबा’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. दिग्दर्शकासोबतच कुमार यांनी लेखक आणि शिक्षक म्हणूनही आपला ठसा उमटवला होता. त्यांच्या निधनामुळे फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.