इंदुर येथे हॉटेलला भीषण आग, अनेकजण अडकले, एकाचा मृत्यू

352

मध्य प्रदेशमधील इंदुर येथे एका हॉटेलला भीषण आग लागली आहे. ‘गोल्डन गेट’ असे हॉटेलचे नाव आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच हॉटेलमध्ये अनेक जण अडकल्याचे बोलले जात आहे. यात अनेकजण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचे सांगितले जात आहे.

इंदुरमधील सर्वात उच्चभ्रू वस्तीतील विजय नगर पोलीस क्षेत्रात गोल्डन गेट हॉटेल आहे. रहीवाशी परिसर असल्याने या हॉटेलमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यास अग्निशमन दलाला अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. हॉटेलमधून आगीबरोबरच धुराचे लोटही आकाशाकडे झेपावत असल्याने परिसरात भीतिचे वातावरण पसरले आहे. यात सहाहून अधिकजण जखमी झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या