
मध्यप्रदेशमधील दमोहमध्ये 6 वर्षीय चिमुकलीवर पाशवी अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घराबाहेर खेळणाऱ्या चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. अत्याचारानंतर नराधम आरोपीने पीडितेचे हात-पात बांधून डोळे फोडले. तसेच तिला मारण्याचाही प्रयत्न केला. पीडिता मृत झाल्याचे समजून आरोपीने पळ काढला. परंतु सुदैवाने मुलीचा जीव वाचला असून, तिला गंभीर अवस्थेत जबलपूरच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, , जबेरामधील बंतीपूर गावात बुधवारी चिमुकली घराबाहेर खेळताना अचानाक बेपत्ता झाली. कुटुंबियांनी बराचवेळ तिला शोधल्यानंतर अखेर पोलिसात तक्रार केली. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगी घराजवळील शेतात बेशुद्ध अवस्थेत सापडली. तिचे हात-पात बांधले होते, डोळे फोडण्यात आले होते आणि तिच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा होत्या. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा तिच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान , या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले आहेत. तर, माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या प्रकरणावरुन एक महिन्यापूर्वीच सत्तेत आलेल्या सरकारवर निशाणा साधला आहे.
दमोह ज़िले में एक मासूम बिटिया के साथ हुई दुष्कर्म की घटना शर्मनाक और दुर्भाग्यपूर्ण है।
मैंने घटना का संज्ञान लेकर अपराधी को जल्द से जल्द पकड़ने के निर्देश दिए हैं। उस दरिंदे को सख्त से सख्त सज़ा दी जाएगी!
बिटिया के समुचित इलाज में किसी भी प्रकार की कमी नहीं आने दी जाएगी।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) April 23, 2020
शिवराज जी , ये प्रदेश में क्या हो रहा है। लॉकडाउन में भी अपराधियों के हौसले बुलंद ?
दमोह के जबेरा में एक मासूम बालिका की दोनो आँख फोड़ने व दरिंदगी की भी बात सामने आ रही है।
1/3— Kamal Nath (@OfficeOfKNath) April 23, 2020





























































