चाफा लावाल तरच खासदार निधी देईन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
chafa-flower

सामना प्रतिनिधी। मुंबई

लोकांच्या आयुष्यातील समस्या सोडवण्याठी खासदार आपला निधी खर्च करतात. पण एका विशिष्ट कारणासाठीच तो पैसा खर्च केला तरच निधी देऊ, अशी विचित्र अट ज्येष्ठ अभिनेत्री आणि राज्यसभेच्या खासदार रेखा यांनी घातली आहे. वांद्रे येथील बँडस्टँडमध्ये चाफ्याची झाडे लावली तर निधी देऊ, असे त्या म्हणाल्या आहेत. खासदार निधीतून बँडस्टँडवर 200 झाडे लावली जाणार आहेत. त्यासाठी 2 कोटी 60 हजारांचा खर्च येणार आहे. रेखा यांच्या या आडमुठेपणाला स्थानिकांनी विरोध केला आहे.