शिवसेना नेते, खासदार संजय राऊत बुधवारपासून पाच दिवसांच्या उत्तर महाराष्ट्र दौर्‍यावर

sanjay-raut-press-conferenc

शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे 9 ते 13 जूनदरम्यान पाच दिवसांच्या उत्तर महाराष्ट्र दौर्‍यावर येत आहेत. या पाच दिवसात शिवसेना संघटन वाढीसाठी ते नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांच्या बैठका घेणार आहेत.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा दौरा पुढीलप्रमाणे असेल. 9 जूनला दुपारी 2 वाजता मुंबई येथून ते नाशिककडे प्रयाण करतील. सायंकाळी 5 वाजता नाशिक येथे ते गाडेकर, पांडे, कुटूंबियांची भेट घेणार आहेत. त्यांचा नाशिकमध्ये मुक्काम असेल. 10 जून रोजी सकाळी 9.30 वाजता नाशिक येथून खाजगी वाहनाने ते धुळ्याकडे प्रवास करतील. दुपारी 2 वाजता धुळे जिल्हा पदाधिकारी व लोकप्रतिनिधीसोबत बैठक घेणार आहेत. सायंकाळी 5 वाजता धुळे येथून नंदुरबारकडे ते प्रयाण करतील. नंदुरबार येथे रात्री त्यांचा मुक्काम असेल.

11 जून रोजी सकाळी 9.30 वाजता नंदुरबार जिल्हा पदाधिकारी व लोकप्रतिनिधीसोबत ते बैठक घेणार आहेत. दुपारी 12.30 ते 2.30 पर्यंतचा वेळ त्यांनी राखीव ठेवला आहे. दुपारी 2.30 वाजता नंदुरबार येथून चोपडा, जि. जळगाव कडे ते प्रयाण करतील. सायंकाळी 5 वाजता चोपडा येथे रावेर लोकसभा पदाधिकारी व लोकप्रतिनिधी बैठक घेणार आहेत. सायंकाळी 7 वाजता चोपडा येथून जळगावकडे ते प्रयाण करतील. रात्री जळगावला त्यांचा मुक्काम असले. 12 जून रोजी सकाळी 9.30 वाजता जळगाव लोकसभा पदाधिकारी व लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेणार आहेत. दुपारी 1 ते 3 पर्यंतचा वेळ त्यांनी राखीव ठेवला आहे. दुपारी 3 वाजता जळगाव येथून नाशिककडे ते प्रयाण करतील. रात्री नाशिक येथे त्यांचा मुक्काम असेल. 13 जून रोजी सकाळी 9.30 वाजता दिंडोरी लोकसभा पदाधिकारी व लोकप्रतिनिधीसोबत बैठक होईल. सकाळी 11.30 वाजता नाशिक लोकसभा पदाधिकारी व लोकप्रतिनिधीसोबत ते बैठक घेतील. दुपारी 2.30 वाजता शासकीय विश्राम गृह येथे त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. दुपारी 3 वाजता ते मुंबईकडे रवाना होतील.

आपली प्रतिक्रिया द्या