… म्हणून सातारकर म्हणतायंत, ‘हा’ जनतेच्या कामाची जाण असणारा खासदार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोमवार 18 नोव्हेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर सातारचे नवनिर्वाचित खासदार श्रीनिवास पाटील यांनी खासदारकीची शपथ घेतली. श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी लोकसभेत एक मुद्दा मांडला. जनतेच्या कामाची जाण असणारा खासदार सातारला मिळाला याबद्दल सातारा जिल्ह्यात आनंद व्यक्त केला जात आहे.

देशभरात सर्वात कमी केंद्रीय विद्यालये महाराष्ट्रात आहेत. सातारा जिल्ह्यात सर्वाधिक आजी-माजी लष्करी अधिकारी राहतात. त्यामुळे सातारा जिल्ह्यात एक केंद्रीय विद्यालय स्थापन करावे, म्हणजे शेतकरी व मजुरांच्या मुलांना लष्करामध्ये भरती होण्यासाठी मदत होईल आणि मिलिटरीमध्ये भरती होण्याचे प्रशिक्षण मिळेल अशी मागणी आज खासदार श्रीनिवास पाटील यांनीनी लोकसभेत केली.

खासदारकीचा राजीनामा देत उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला. अवघ्या तीन महिन्यात त्यांनी पक्ष सोडून भाजपात प्रवेश केला. त्यामुळे सातारा लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडूनश्रीनिवास पाटील तर भाजपाकडून उदयनराजे भोसले उभे होते. या निवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा पराभव केला होता. यापूर्वी तत्कालीन कराड लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रतिनिधित्व केले तर सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील आहेत.