खासदार सनी देओल बेपत्ता, मतदारसंघात लागले पोस्टर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूड अभिनेता आणि गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार सनी देओल बेपत्ता झाले आहेत. अशा आशयाचे पोस्टर मतदारसंघात लागले आहेत.

भाजप खासदार सनी देओल यांनी अनेक दिवस आपला मतदारसंघ गुरुदासपरमध्ये भेट दिली नहई. त्यामुळे काही लोकांनी सनी देओल बेपत्ता असल्याचे पोस्टर लावले आहेत. तसेच सनी देओल यांनी गेली अनेक दिवस मतदारसंघाचा दौरा न केल्याने विरोधी पक्षानी त्यांच्यावर टीका केली आहे. या सगळ्यात अजूनही सनी देओल यांची कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. पंजाबी समुदायाचा लोहरी या सणाच्या शुभेच्छा सध्या सनी देओल यांनी दिल्या आहेत.

या पोस्टरचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी ट्विटरवर सनी देओल यांना ट्रोल केले आहे. सनी पाजीला पाकिस्तानमध्ये शोधा, तिथे हँडपंप उखडण्यासाठी ते गेले असावे असा टोला काहींनी लगावला आहे. तर काहींनी म्हटले आहे की, फेस वॅल्यू असल्यावर सगळी कामे होतात अस भाजपला वाटतं.

सनी देओल यांना शेवटचे नागपूरमध्ये पाहण्यात आले होते. तिथे राष्ट्रीय युवा दिना निमित्त खासदर क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीसोंब ते होते. तसेच सनी देओल अनेकवेळा नागपुरातील रेशीमबागेतील संघाच्या कार्यालयातही पाहिले गेले आहे.