Breaking news – महेंद्रसिंह धोनीची निवृत्तीची घोषणा

1756

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आज सायंकाळी 7 वाजून 29 मिनिटांनी इन्स्टाग्राम वरून ही माहिती दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी धोनी यंदा यूएईमध्ये होणारी आयपीएल स्पर्धा खेळणार आहे.


View this post on Instagram

Thanks a lot for ur love and support throughout.from 1929 hrs consider me as Retired

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on

39 वर्षीय धोनीने याआधी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेट तो खेळत होता. मात्र 2019 मध्ये एक दिवसीय वर्ल्डकपनंतर त्याच्यावर संन्यास घेण्याचा दबाव वाढला होता. अखेर आयपीएलसुरू होण्यापूर्वी त्याने निवृत्तीची घोषणा केली.

2004 ला क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केलेल्या धोनीने 16 वर्षांच्या कारकिर्दीत 90 कसोटी, 350 आणि 98 टी-20 सामने खेळले. कसोटीत 6 आणि एक दिवसीय क्रिकेटमध्ये 10 शतक त्याच्या नावावर आहेत.

जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षक फलंदाजात धोनीची गणना होते. कसोटीत त्याने 294, एक दिवसीय क्रिकेटमध्ये 444 आणि टी-20 मध्ये 91 शिकार त्याने केले आहेत. त्याच्याच नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2007 चा टी-20 आणि 2011 चा एक दिवसीय वर्ल्डकप जिंकला होता.

 

आपली प्रतिक्रिया द्या