18 महिन्यांत भाजप उमेदवाराची संपत्ती 185 कोटींनी वाढली

591

कर्नाटकच्या होसकोट विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार एमटीबी नागराज यांच्या संपत्तीत गेल्या अठरा महिन्यांत तब्बल 185 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. एमटीबी नागराज हे देशातील श्रीमंत राजकीय नेत्यांपैकी एक आहेत. 66 वर्षीय नागराज हे तीन वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले आहेत. काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकारमध्ये त्यांनी गृहनिर्माण मंत्रिपद भूषवले असून मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या नेतृत्वातील काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकार कोसळण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे.

काँग्रेसकडून निवडणूक लढताना एप्रिल 2018 मध्ये त्यांनी 1063 कोटींची संपत्ती जाहीर केली होती. काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपकडून निवडणूक लढविणाऱया नागराज यांची संपत्ती 1223 कोटींवर पोहचली असल्याचे निवडणूक अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून दिसून येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या