
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारामुळे मुंबई शेअर बाजारातील अनेक कंपन्यांना कोट्यवधीचे नुकसान होत आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती 30 टक्क्यांनी घसरल्याने उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत एका दिवसात तब्बल 44 हजार कोटींची (5.6 अब्ज डॉलर्स) घट झाली आहे, असे ‘फोर्ब्स रियल टाइम’ने म्हटले आहे.
रशिया आणि आखाती देशांमधील कच्च्या तेलाच्या किमतीवरून सुरू असलेल्या संघर्षाचा फटका मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीच्या शेअर्सला बसला आहे. कच्च्या तेलाच्या किमती 30 टक्क्यांनी घटल्यामुळे सोमवारी मुंबई शेअर्स बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये मोठय़ा प्रमाणात घसरण झाली. गेल्या 11 वर्षांतील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीला झालेला हा सर्वात मोठा तोटा आहे.
- कच्च्या तेलाच्या घसरणीमुळे अंबानी यांची संपत्ती68 टक्क्यांनी घटली असून आता त्यांच्याकडे सध्या 42.2 अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती आहे.
- कच्च्या तेलाच्या या संघर्षाचा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला आणखी फटका बसू शकतो, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
- रिलायन्स शेअर्सच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे सध्या रिलायन्सचे बाजारमूल्य 7,05,655.56 लाख कोटी इतके झाले आहे.

























































