भाजपला बंगालमध्ये पुन्हा दणका, मुकुल रॉय स्वगृही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सलग तिसऱयांदा सत्ता स्थापन करणाऱया मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला पुन्हा जोरदार झटका दिला आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय स्वगृही म्हणजे तृणमूल काँग्रेसमध्ये परतले आहेत.

तृणमूल भवन येथे पक्षाध्यक्षा, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत मुकुल रॉय आणि त्यांचा मुलगा शुभ्रांशु रॉय यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना रॉय म्हणाले, मी माझ्या घरी परतलो आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये जी परिस्थिती आहे ती पाहता भाजपमध्ये कोणीही राहू शकत नाही.

भाजप हा सामान्य लोकांचा पक्ष नाही. भाजपमध्ये गेलेल्या कोणालाही शांततेत राहू दिले जात नाही. नेहमी लोकांना दबावात ठेवले जाते हेच मुकुल रॉय यांच्या स्वगृही परतण्यावरून सिद्ध होते, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. भाजपमध्ये गेलेले अनेक तृणमूल नेते स्वगृही परतण्यास इच्छुक आहेत. या प्रश्नावर ममता बॅनर्जी म्हणाल्या, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ज्यांनी पक्ष सोडला त्यांना परत पक्षात घेणार नाही.

भाजपला आणखी हादरे बसणार
z तृणमूल काँग्रेस सोडून 2017 मध्ये भाजपमध्ये गेलेले मुकुल रॉय हे पहिले नेते होते. तृणमूलमध्ये ममता बॅनर्जींनंतर क्रमांक दोनचे नेते अशी त्यांची ओळख होती. ते पेंद्रात मंत्रीही राहिले होते. रॉय यांना तृणमूलने सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले होते. त्यांना भाजपने राष्ट्रीय उपाध्यक्ष पद दिले होते. रॉय यांनी पक्ष सोडल्याने भाजपला मोठा दणका बसला आहे.
z भाजपला आणखी हादरे बसण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये गेलेले काही आमदार, नेते लवकरच पुन्हा तृणमूलमध्ये परतण्याच्या तयारीत आहेत.