दिवसा जमू नका, रात्री फिरू नका!

अनलॉकमुळे मोकाट सुटलेल्या मुंबईकरांची जागोजागी गर्दी सुरू आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी अखेर शहरात दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू केली आहे. 15 दिवसांसाठी ही बंदी लागू असेल. रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत मुंबईकरांना घराबाहेर पडण्यास बंदी असणार आहे. या वेळेत पुणी सापडला तर पोलीस त्याच्यावर कडक कारवाई करतील असा इशारा देण्यात आला आहे.

– पहाटे 5 ते रात्री 9 या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱयांनाच बाहेर पडण्याची परवानगी.
– जमावबंदीतून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांना वगळण्यात आले आहे.
– सर्वसामान्यांना कामासाठी केवळ दोन किलोमीटरपर्यंत प्रवास करण्याची मुभा.
– नियमभंग करणाऱया वाहनचालकांवर कारवाईचा बडगा. तीन दिवसांत पोलिसांनी 15 हजार वाहने जप्त केली.

नवी मुंबई उद्यापासून दहा दिवस लॉकडाऊन
कोरोनचा फैलाव रोखण्यासाठी नवी मुंबई शहरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून ते 13 जूनपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी आज रात्री उशिरा जारी केले. या दहा दिवसाच्या लॉकडाऊनची अंमलबजावणी संपूर्ण शहरात होणार असली तरी एपीएमसी मार्केटला मात्र त्यातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे या लॉकडाउनचा परिणाम मुंबई आणि परिसरामध्ये पुरवठा होणाऱया शेतमालावर आणि अन्नधान्यावर होणार नाही. शहरातील सार्वजनिक प्रवासी वाहतूक मात्र पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल.

आपली प्रतिक्रिया द्या