मुंबईत 1504 कोरोनाबाधित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना रुग्णवाढ कायम असून गेल्या 24 तासांत करण्यात आलेल्या 14,129 चाचण्यांमध्ये 1504 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यूही झाला आहे. मुंबईत आढळलेल्या रुग्णांमधील 60 बाधितांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील 18 जणांना ऑक्सिजनची गरज लागली, तर एकाच दिवसात 1645 जणांनी कोरोनावर मात केली.