मुंबईत कोरोनाचे 281 रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत आज दिवसभरात कोरोनाचे 281 रुग्ण सापडले तर एकाचा मृत्यू झाला. एकूण रुग्णांपैकी 262 रुग्णांना कोणतीही लक्षणे नव्हती तर 19 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाच जणांना ऑक्सिजन बेड देण्यात आला. 272 जण कोरोनामुक्त झाले तर सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजार 806 वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98 टक्के इतके असून रुग्ण दुपटीचा कालावधी 3 हजार 114 वर पोहोचला आहे. दरम्यान, राज्यात आज दिवसभरात 2 हजार 203 रुग्ण सापडले तर तीन जणांचा मृत्यू झाला. 2 हजार 478 जण कोरोनामुक्त झाले. सक्रिय रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असून सध्या राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 13 हजार 665 वर पोहोचली आहे.