
मुंबईत गेल्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. गेल्या 24 तासांत 77 रुग्ण वाढले असून आज दिवसभरात एकूण 295 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुंबईची चिंता वाढली आहे. मात्र सुदैवाने दिवसभरात एकही मृत्यू झालेला नाही.
मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नांमुळे कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात आहे. मात्र गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईत मंगळवारी 218 रुग्ण सापडले, तर आज दिवसभरात 295 रुग्ण सापडले. त्यापैकी 283 जणांना कोणतीही लक्षणे नाहीत. यापैकी 12 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तर एकाला ऑक्सिजन बेडची गरज लागली आहे. दिवसभरात 194 जण कोरोनामुक्त झाले. मुंबईत बरे होणाऱयांचे प्रमाण हे 98 टक्के असून रुग्णसंख्या वाढीचा दर हा 0.017 इतका कमी आहे, तर रुग्ण दुपटीचा कालावधी 3 हजार 973 दिवसांवर पोहोचला आहे.

























































