आरेतील हल्लेखोर बिबट्या जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आरे वसाहतीमध्ये तीन जणांवर प्राणघातक हल्ला करणारा बिबटय़ा अखेर आज जेरबंद झाला. वसाहतीमधील युनिट नंबर 3 येथे वनखात्याने लावलेल्या पिंजऱयात पहाटे 3 च्या सुमारास तो अडकला. वनखात्याचे अधिकारी आणि कर्मचारी त्याला पकडण्यासाठी रात्रभर डोळय़ात तेल घालून होते.

एकाच आठवडय़ात तीन जणांवर बिबटय़ाने हल्ला केल्याने आरे वसाहतीमध्ये दहशत पसरली होती. आरे वसाहतीमधील युनिट नंबर 3 येथून या बिबटय़ाची ये-जा होत असल्याच्या माहितीनंतर वनखात्याने त्याच्या संभाव्य मार्गावर पिंजरा लावला होता.

आज सकाळी सात वाजता या बिबटय़ाला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आले. तिथे त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. आरे वसाहतीमध्ये दहशत पसरवणारा बिबटय़ा हाच आहे का याबाबत खातरजमा केली जात असल्याची माहिती वनखात्याचे रेंज अधिकारी दिनेश दिसले यांनी दिली. गेल्या महिनाभरात बिबटय़ाने माणसांवर हल्ला करण्याच्या पाच घटना आरे वसाहतीमध्ये घडल्या आहेत.