फोर्टमध्ये शिवसेनाप्रमुखांचा भव्य पूर्णाकृती पुतळा! 23 जानेवारीला दिमाखदार लोकार्पण सोहळा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती दिमाखदार पुतळा फोर्टमध्ये झळकणार आहे. गेट वे ऑफ इंडियाजवळील रिगल सिनेमा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयासमोरील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौकातील बेटावर हा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे दिमाखदार लोकार्पण शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनी 23 जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

ज्कलंत हिंदुत्काचे सरसेनापती, मराठी माणसाच्या मनात आत्मसन्मानाचे स्फुलिंग चेतकणारे आणि जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल केवळ मुंबई-महाराष्ट्रातच नव्हे तर देश-विदेशात प्रचंड कुतूहल, आदर आहे. संपूर्ण हिंदुस्थानचे ते लाडके नेते होते. देशाच्या या लाडक्या नेत्याचे 17 नोव्हेंबर 2012 रोजी महानिर्वाण झाले. शिवसेनाप्रमुखांचे विचार आणि सामाजिक कार्याचे स्फूर्तिदायक स्मरण लोकांसमोर कायम राहावे यासाठी आणि शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येत आहे. शिवसेनाप्रमुखांचा मुंबईत उभारला जाणारा हा पहिलाच भव्य पुतळा ठरणार आहे. या पुतळ्याचे लोकार्पण शनिवार 23 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, वस्त्र्ााद्योगमंत्री अस्लम शेख यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे निमंत्रण महापौर किशोरी पेडणेकर यांनी ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले. यावेळी नगरसेवक सचिन पडवळ उपस्थित होते.

9 फुटी उंचीचा ब्राँझचा पुतळा

शिवसेनाप्रमुखांच्या या पुतळ्याची उभारणी प्रबोधन प्रकाशनच्या वतीने करण्यात आली आहे. हा पुतळा 9 फूट उंच असून बाराशे किलो ब्राँझपासून बनवण्यात आला आहे. हा पुतळा दोन फूट उंच हिरवळीसह सुमारे 14 फूट उंचीच्या चौथऱयावर बसवण्यात आला आहे. हा पुतळा शिल्पकार शशिकांत वडके यांनी बनवला असल्याची माहिती आमदार रवींद्र वायकर यांनी दिली. दरम्यान, या पुतळ्यामुळे मुंबईच्या सौंदर्यात भर पडणार असून मुंबईकर-पर्यटकांना शिवसेनाप्रमुखांच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घेता येणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या