
सेल्फीच्या नादात अनेकांनी आपला जीव गमावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. नुकताच व्हायरल झालेला एका व्हिडीओत एक जोडपं समुद्र किनाऱ्यावर लाटांचा आनंद घेताना दिसत आहेत. यावेळी त्यांची मुलगी त्यांचा व्हिडीओ बनवत होती आणि त्यानंतर अचानक असे काही झाले की क्षणात होत्याचे नव्हते झाले.
या व्हिडीओमध्ये, एक जोडपं एका दगडावर बसून समुद्राच्या लाटांचा आनंद घेताना दिसत आहेत आणि त्यांची लहान मुलगी त्यांचा व्हिडीओ बनवत होती. मुलीचा आवाज या व्हिडीओमध्ये स्पष्ट ऐकू येत आहे. समुद्राच्या लाटा उसळताना दिसत आहे आणि जोडप्याने एकमेकांना पकडून ठेवलेले आहे. त्यानंतर एक मोठी लाट येते आणि ती महिला त्या लाटेमुळे तोल जावून पाण्यात पडले आणि वाहून जाते. महिलेचा नवरा तिला वाचविण्याचा प्रयत्न करतो पण काहीच उपयोग होत नाही. व्हिडीओत मम्मी-मम्मी ओरडताना मुलीचा आवाज ऐकू येत आहे.
या महिलेचे नाव ज्योती सोनार असून ती 32 वर्षांची होती. महिलेचा पती रबाळे येथील गौतम नगर येथील मुकेश एका खासगी फर्ममध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करतो. त्यांनी सांगितले की, मी तिला वाचविण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र चौथ्यांदा जी लाट आली ती इतकी मोठी होती की, आमचा तोल गेला आणि दोघंही पाण्यात पडलो. मी जेव्हा माझ्या पत्नीची साडी पकडली त्यावेळी एका व्यक्तीने माझा पाय पकडला मात्र तिला वाचवू शकलो नाही. त्यांनी पुढे सांगितले की, मी तिला घट्ट पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र ती निसटली आणि माझ्या डोळ्यासमोर समुद्रात ओढली गेली. माझ्या मुलीच्या डोळ्यादेखत हे सर्व झाले. आम्ही मदतीसाठी आरडाओरडा करत होतो मात्र कोणीही काही करू शकले नाही.
कम से कम बच्ची की आवाज़ सुन लेते. pic.twitter.com/YQaLgSgejR
— Awanish Sharan 🇮🇳 (@AwanishSharan) July 15, 2023
सायंकाळी 5.12 वाजण्याच्या सुमारास ही घटना पाहिल्यानंतर आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसह पोलीस घटनास्थळी पोहोचले. मुंबई अग्निशमन दलाच्या शोध मोहिमेनंतर रविवारी रात्री उशिरा ज्योतीचा मृतदेह सापडला. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे पोहोचताच त्यांना मृत घोषित करण्यात आले. मुकेशच्या म्हणण्यानुसार, ते आणि त्यांची 12 वर्षांची मुलगी आणि सहा ते आठ वर्षाची मुलं कायम पिकनिकला जात असतात. मुलं फिरायला जाण्याचा हट्ट करत होते.
मुकेशच्या म्हणण्यानुसार, हे जोडपे आणि त्यांची 12 वर्षांची मुलगी, सहा आणि आठ वर्षांचा मुलगा आम्ही सुट्टीच्या दिवसात फिरायला जात असतो. त्यामुळे मुलं कायम पिकनिकची वाट पाहयचे. कुठे जायचे हे ठरवल्यानंतर कुटुंबाने मुकेशच्या मित्राकडून दिवसभरासाठी ऑटो भाड्याने घेतली. ज्योती संपूर्ण दिवसाचे जेवण बांधून घ्यायची. रविवारी आम्ही जुहू चौपाटीवर जाण्याचे ठरवले होते. मात्र, भरती-ओहोटीमुळे समुद्रकिनाऱ्यावर प्रवेशबंदी करण्यात आली आणि त्यानंतर आम्ही भेलपुरी सेंटरमध्ये रात्रीचे जेवण करून वांद्र्याच्या दिशेने निघालो. येथे वांद्रे बॅण्डस्टॅण्डला गेलो आणि त्यावेळी हा अपघात झाला.


























































