अभिनेत्याच्या मुलीचा पाठलाग करणाऱ्याला अटक

467
crime

बॉलीवूड अभिनेत्याच्या मुलीचा पाठलाग करणाऱयाला बुधवारी ओशिवरा पोलिसांनी अटक केली. त्याची न्यायालयाने जामिनावर सुटका केली.

तक्रारदार हे बॉलीवूड अभिनेते आहेत. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांत काम केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांची मुलगी ही अंधेरी येथील जिममध्ये जात आहे. रविवारी रात्री ती तिच्या इमारतीजवळ मैत्रिणीची वाट पाहत उभी होती तेव्हा अटकेत असलेला तरुण तेथे आला. तिने बोलण्यास नकार दिला. दुसऱया दिवशी त्याने तरुणीचा पाठलाग केला. तिने घडलेल्या प्रकाराची माहिती नातेवाईकांना दिली. ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तरुणाला ताब्यात घेतले. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.

आपली प्रतिक्रिया द्या