मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसाठी 2 हजार 516 उमेदवारी अर्ज दाखल, छाननी सुरू

मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ च्या अनुषंगाने नामनिर्देशनपत्र स्‍वीकारण्‍याच्‍या अखेरच्‍या दिवशी म्‍हणजेच मंगळवार २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून मिळून एकूण २ हजार १२२ नामनिर्देशन अर्ज दाखल दाखल झाले आहेत. तर, नामनिर्देशपपत्र सादर करण्‍याच्‍या अखेरच्‍या दिवसापर्यंत म्‍हणजे मंगळवार एकूण मिळून २ हजार ५१६ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. आज सकाळी ११ वाजेपासून नामनिर्देशनपत्रांची छाननी केली जाणार आहे. छाननी प्रक्रिया पूर्ण केल्‍यानंतर वैधरित्‍या नामनिर्देशित झालेल्‍या उमेदवारांची यादी लगेच प्रसिद्ध करण्‍यात येणार आहे.

राज्‍य निवडणूक आयोग, महाराष्‍ट्र यांनी जाहीर केलेल्‍या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ च्या कार्यक्रमानुसार, उमेदवारांना नामनिर्देशन पत्रे देण्यास मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर २०२५ पासून सुरुवात झाली. त्‍यानुसार, मंगळवार, दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते ४ यावेळेत नामनिर्देशनपत्रांचे वितरण तर, सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे स्‍वीकारण्‍यात आली.

नामनिर्देशनपत्र स्‍वीकारण्‍याच्‍या अखेरच्‍या दिवशी म्‍हणजेच मंगळवार निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून मिळून एकूण २ हजार १२२ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत. तर, सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ५९४ नामनिर्देशन पत्रांचे वितरण करण्‍यात आले आहे.

मंगळवार एकूण मिळून ११ हजार ३९१ नामनिर्देशन पत्रांचे वितरण झाले. तर, काल अखेर एकूण मिळून २ हजार ५१६ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत.

प्रशासकीय विभाग / वितरण केलेले नामनिर्देशन पत्र संख्‍या/ आज प्राप्‍त नामनिर्देशन पत्रे/ आजअखेर एकूण प्राप्‍त नामनिर्देशन पत्रे याची माहिती पुढीलप्रमाणे –

१) ए + बी + ई विभाग (RO २३) – ४५ / ११८ / १५० प्राप्‍त

२) सी + डी विभाग (RO २२) – २० / ५० / ५८ प्राप्‍त

3) एफ दक्षिण विभाग (RO २१ ) – ०८ / ६४/ ७५ प्राप्‍त

४) जी दक्षिण विभाग (RO २०) – ३५ / ७७ / ८६ प्राप्‍त

५) जी उत्‍तर विभाग (RO १९) – ३३ / ११३ / १३७ प्राप्‍त

६) एफ उत्‍तर विभाग (RO १८) – ४० / १०५ / ११८ प्राप्‍त

७) एल विभाग (RO १७) – २१ / १०१ / ११६ प्राप्‍त

८) एल विभाग (RO १६) – ३४ / ९१ / १११ प्राप्‍त

९) एम पूर्व विभाग (RO १५) – ३७ / १५८ / १८२ प्राप्‍त

१०) एम पूर्व + एम पश्चिम (RO १४) – ६१ / १५२/ १६४ प्राप्‍त

११) एन विभाग (RO १३) – २० / ९७ / १२३ प्राप्‍त

१२) एस विभाग (RO १२) – ३९ / ११५ / १२५ प्राप्‍त

१३) टी विभाग (RO ११) – ३० / ८८ / १०९ प्राप्‍त

१४) एच पूर्व विभाग (RO १०) – २६ / १०६ / १२५ प्राप्‍त

१५) के पूर्व + एच पश्चिम विभाग (RO ९) – १६ / ८५ / ९३ प्राप्‍त

१६) के पश्चिम विभाग + के पूर्व (RO ८) – ० / ८३ / १०४ प्राप्‍त

१७) के पश्चिम विभाग (RO ७) – २७ / १०४ / १३३ प्राप्‍त

१८) पी दक्षिण विभाग (RO ६) – १६ / ६९ / ८१ प्राप्‍त

१९) पी पूर्व विभाग (RO ५) – २८ / ९८ / ११७ प्राप्‍त

२०) पी उत्‍तर विभाग (RO ४) – ०७ / ५९ / ८९ प्राप्‍त

२१) आर दक्षिण विभाग (RO ३) – १८ / ९५ / १०९ प्राप्‍त

२२) आर मध्‍य विभाग (RO २) – ११ / ४७ / ५१ प्राप्‍त

२३) आर उत्‍तर विभाग (RO १) – २२ / ४७ / ६० प्राप्‍त

एकूण – वितरित ५९४ / २१२२ / २५१६ प्राप्‍त