मुंबई पूर्ण नियंत्रणात; रुग्णसंख्या घटली, डबलिंग रेट दीडशेपार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

Coronaमुंबईत कोरोनाची दुसरी लाट आता पूर्ण नियंत्रणात आली असून दैनंदिन रुग्णसंख्या दहा हजारांवरून थेट अडीच हजारांच्या घरात आली आहे. आज मुंबईत 2403 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असले तरी 3 हजार 375 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे मुंबईत आता केवळ 47416 सक्रिय रुग्ण राहिले आहेत. दरम्यान, मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 153 दिवसांवर गेला असून रुग्ण बरे होण्याचा कालावधी 91 टक्के झाला आहे.

मुंबईत दुसऱया लाटेत वाढणारी रुग्णसंख्या रोखण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या. यामध्ये एप्रिलपासूनच विकेंडसाठी लागू करण्यात आलेले कठोर निर्बंध आणि मे महिन्याच्या सुरुवातीपासून निर्बंध आणखी कठोर करण्यात आल्यामुळे कोरोना नियंत्रणात येण्यास मोठी मदत झाली आहे. याशिवाय कोरोना चाचण्या 30 ते 40 हजारांपर्यंत करून पॉझिटिव्ह आढळणाऱया रुग्णांसाठी प्रभावी क्वारंटाइन, औषधोपचार केल्यामुळे सद्यस्थितीत कोरोना रुग्णसंख्या चांगलीच नियंत्रणात आली आहे.

मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी

  • दहिसर 89 दिवस
  • अंधेरी पूर्व 120 दिवस
  • मालाड 121 दिवस
  • कुलाबा 121 दिवस
  • अंधेरी पश्चिम 134 दिवस
  • भायखळा 135 दिवस
  • गोरेगाव 135 दिवस
  • एल्फिन्सटन 139 दिवस
  • खार 143 दिवस
  • वांद्रे 143 दिवस
  • कुर्ला 154 दिवस
  • ग्रॅण्ट रोड 155 दिवस
  • चेंबूर 159 दिवस
  • सॅण्डहर्स्ट रोड 172 दिवस
  • भांडुप 180 दिवस
  • मुलुंड 205 दिवस
  • घाटकोपर 215 दिवस
  • परळ 217 दिवस
  • चेंबूर प. 220 दिवस
  • मरीन लाइन्स 277 दिवस