
राज्यातील लसीकरण मोहिमेच्या धडाक्यापुढे कोरोना विषाणूची घुसमट झाली आहे. दुसऱया लाटेत थैमान घालणाऱया या विषाणूचा संसर्ग आता मुंबईसह राज्यभरात बऱयापैकी आटोक्यात आला आहे. मुंबई शहरात रुग्णदुपटीचा म्हणजेच रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी 2030 दिवसांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर राज्याचा रिकव्हरी रेट 97 टक्क्यांवर गेला असून मृत्यूदर 2.11 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
राज्याच्या आरोग्य यंत्रणेने तसेच मुंबई महापालिकेने कोरोना लसीकरण मोहिमेला चांगलीच गती दिली आहे. दिवसभरात विक्रमी लसीकरण करीत कोरोनाचे नाव ठेचण्यात आरोग्य यंत्रणा यशस्वी ठरल्याचे राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीकरून सिद्ध झाले आहे. राज्यात गेल्या काही दिकसांत कोरोनाच्या नक्या रुग्णांच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.
मुंबईत कोरोनाची नवीन रुग्णसंख्या आणि मृत्यूदरावर मोठय़ा प्रमाणावर नियंत्रण मिळवले गेले आहे. रविकारी मुंबईत केवळ 259 नवे रुग्ण आढळले, तर 281 जणांनी कोरोनावर मात करून घर गाठले. शहरात सध्या 2 हजार 825 रुग्ण उपचार घेत आहेत. शहरात कोरोनाची दुसरी लाट केगाने ओसरल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
































































