मुंबई पालिकेतही बायोमेट्रिक हजेरी बंद ठेवण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बायोमेट्रिक हजेरीच्या माध्यमातून कोरोना व्हायरसचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणसह काही सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी तात्पुरती ठेवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता मुंबई महानगरपालिकेतही कोरोना व्हायरस नियंत्रणात येईपर्यंत बायोमेट्रिक हजेरी तात्पुरती बंद ठेवावी, अशी मागणी कामगार संघटनांनी आज पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याकडे केली.

पालिका कर्मचाऱयांच्या मुंबई महापालिका कार्यालयीन कर्मचारी संघटना तसेच दि म्युनिसिपल युनियन या कामगार संघटनांनी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना आज पत्र दिले. या पत्रामध्ये बायोमेट्रिक हजेरीमुळे कोरोना व्हायरस पसरू शकतो. यामुळे कर्मचाऱयांच्या सुरक्षेसाठी बायोमेट्रिक हजेरी तात्पुरती बंद ठेवावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, याबाबत पालिका आयुक्तांकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे समजते.