मुंबईत 1,354 नवे रुग्ण, 73 जणांचा मृत्यू

687
मुंबईत एका दिवसात कोरोनाचे 1,354 नवे रुग्ण सापडले असून 73 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 2183 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता 61 हजार 934 वर पोहोचली आहे.

मुंबईत 73 जणांचा मृत्यू झाला असून मुंबईतील एकूण मृतांची संख्या आता 5 हजार 202 झाली आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या कमी होऊन 22 हजार 738 वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईतील कोरोनाची लागण होण्याचा डबलिंग रेट आता आणखी दोन दिवसांनी वाढून 49 दिवसांवर आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या