मुंबईत 1244 नवे कोरोनाबाधित, 52 जणांचा मृत्यू; एकूण आकडा 39 हजार 464 वर

1532

मुंबईत गेल्या 24 तासांत 1244 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून प्रलंबित 8 रिपोर्टसह 52 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 39 हजार 464 झाली असून मृतांचा आकडा 1279 झाला आहे.

मुंबईत मृत्यू झालेल्या 52 जणांमध्ये 23 पुरुष आणि 29 महिलांचा समावेश आहे. तर यातील 22 जणांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त होते. तर 28 रुग्ण 40 ते 60 वर्षे वयोगटातील आणि दोन रुग्ण 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. मृतांमधील 28 जणांना काही दीर्घकालीन आजारही होते. दरम्यान, गेल्या एकाच दिवसांत 430 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या 16 हजार 794 झाली आहे.

डायलिसिस रुग्णांसाठी स्वतंत्र प्रणाली

मुत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असणार्‍या आणि डायलिसिसची आवश्यकता असणार्‍या रुग्णांसाठी मूत्रविकार तज्ज्ञ आणि आयआयटी मुंबईच्या अभियंत्यांनी मिळून खास प्रणाली विकसित केली आहे. ज्यावेळी डायलेसिस केंद्रांना कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास त्याची नोंद या प्रणालीत करण्यात येते. यानुसार त्याला आवश्यक असणारी डायलिसिस केंद्रांची माहिती या ठिकाणी मिळते. मुंबईत सध्या असणार्‍या 168 डायलिसिस केंद्रांची नोंदणी यात करण्यात आली आहे. यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांना सेवा देणारी 17, संशयितांना सेवा देणारी 2, दोघांनाही सेवा देणारी 105 डायलेसिस केंद्रे आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या