दहा दिवस चिंतेचे; मुंबई कोणत्याही क्षणी लॉकडाऊन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुढील दहा दिवस चिंतेचे आहेत. त्यामुळे नागरिकांनी गरज नसेल तर घराबाहेर पडू नये. लोकांनी ऐकले नाही तर मुंबई कोणत्याही क्षणी लॉकडाऊन होऊ शकते, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

लॉकडाऊन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू आहे. मात्र तसे करायचे झाल्यास पर्यायी व्यवस्था करावी लागेल, असेही आरोग्यमंत्री म्हणाले. पुण्यात बऱयापैकी शुकशुकाट आहे, पण मुंबईकरांनी स्वतःहून बाहेर पडणे टाळावे. नाही तर सरकारला कारवाई करावीच लागेल. जर शहरातील बाधित व्यक्ती ग्रामीण भागात गेली तर तेथे फार मोठा धोका होऊ शकतो, असेही टोपे यांनी सांगितले.

दिवसभरात तीन रुग्ण

राज्यात आज दिकसभरात तीन कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 48 झाली आहे. नगर जिह्यातील 51 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळला असून तो आपल्या पत्नीसह दुबईला गेला होता. त्याचप्रमाणे मुंबई तसेच उल्हासनगर येथे प्रत्येकी एक कोरोना रुग्ण आढळून आला आहे. इतर दोन रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
लंडनहून आलेल्या एका 22 वर्षीय महिलेला तर दुबईहून आलेल्या एका 49 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.

  • 12 तासांत 7 रुग्ण
  • देशात 172
  • राज्यात 48

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची स्थिती

  • पिंपरी-चिंचकड 11
  • पुणे 8
  • मुंबई 9
  • नागपूर 4