मुंबईत तिसरी लाट ओमायक्रोनचीच, जिनोम सिक्वेंसिंगमध्ये 89 टक्के ओमायक्रोन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत डिसेंबरअखेर आलेली कोरोनाची तिसरी लाट ही सर्वाधिक प्रसाराच्या वेग असलेल्या ओमायक्रोन व्हेंरिएंटमुळेच असल्याचे पालिकेच्या जिनोम सिक्वेंसिंग अहवालातून समोर आले आहे. जिनोम सिक्वेंसिंगच्या आठव्या फेरीत 373 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी 280 नमुने मुंबई पालिका क्षेत्रातील तर उर्वरित नमुने हे मुंबई बाहेरील होते. यामध्ये 8 टक्के डेल्टा डेरिव्हेटिव्ह 3 टक्के बाधित आढळले.

जिनोम सिक्वेंसिंग अहवालात पालिका क्षेत्रातील 280 नमुन्यांपैकी 89 टक्के म्हणजे 248 नमुने हे ‘ओमायक्रॉन’ या उप प्रकाराने बाधित असल्याचे निदर्शनास आले. 8 टक्के अर्थात 21 नमुने हे ‘डेल्टा डेरिव्हेटिव्ह’ या उप प्रकाराने, तर उर्वरित सुमारे 3 टक्के अर्थात 11 नमुने हे इतर उप प्रकारांचे असल्याचे आढळून आले. या 11 नमुन्यांपैकी 2 नमुने हे ‘डेल्टा व्हेरिएंट’ या उप प्रकाराने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे. पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशांनुसार या चाचण्या होत आहेत.

  • ‘कोविड’ प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या आधारे विश्लेषण केले असता 280पैकी 7 रुग्णांनी लशीची पहिली मात्रा घेतलेली होती. यापैकी 6 रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले, तर 2 रुग्णांना अतिदक्षता कक्षात दाखल करावे लागले. लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या 174 रुग्णांपैकी 89 रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यापैकी 2 रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली, तर 15 रुग्णांना अतिदक्षात विभागात दाखल करावे लागले.