
मुंबईत कोरोना पूर्ण नियंत्रणात आला असताना जी/दक्षिण वरळी, एच पूर्व पश्चिम वांद्रे आणि एल कुर्ला विभाग कंटेनमेंट झोनमुक्त झाल्याची समाधानकारक आकडेवारी समोर आली आहे. चारही प्रभागांतील इमारत किंवा झोपडपट्टय़ांमध्ये एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही. त्यामुळे या वॉर्डनी कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे.
मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर झपाटय़ाने रुग्णवाढ झाल्याने रुग्ण आढळणाऱया भागात पालिकेकडून कंटेनमेंट झोन जाहीर करून नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात आली. कोरोना उच्च पातळीवर वाढत असताना पालिकेचा हा निर्णय महत्त्वाचा ठरला. प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवा वगळता बाहेरच्या व्यक्तीला आणि आतील व्यक्तींना ये-जा करण्यास मज्जाव करण्यात आला. काही ठिकाणी तर पोलीस पहाराही ठेवण्यात आला. त्यामुळे कोरोना प्रसारास आळा बसून रुग्णसंख्या कमी होण्यात मोठी मदत झाली.
मुंबईत 42 इमारती, 1700 सील मजले
मुंबईत सद्यस्थितीत 42 पूर्ण इमारती सील असून दोन हजार रहिवासी प्रतिबंधात आहेत. तर 1700 मजले सील असून 61 हजार लोक प्रतिबंधित क्षेत्रात आहेत.
चार सर्वोत्तम वॉर्डची स्थिती
विभाग सक्रिय रुग्ण
वरळी 155
वांद्रे पूर्व 160
वांद्रे पश्चिम 316
कुर्ला 157


























































