
पश्चिम रेल्वेवर आरपीएफने महिलांच्या डब्यात घुसखोरी करणाऱयांवर केलेल्या कारवाईत 2020-21 मध्ये 64 लाखांहून अधिक दंड वसूल केला आहे. तर मध्य रेल्वेने 2021 मध्ये (31 मेपर्यंत) 191 गुन्हे दाखल करीत 43,700 रुपयांचा दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे लोकल प्रवासावर निर्बंध असतानाच्या काळात इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वेच्या आरपीएफने 2020-21 मध्ये महिलांच्या डब्यात घुसखोरी करणाऱयांवर कारवाई केली आहे. त्यात महिला डब्यातून प्रवास करणाऱया 3922 पुरुष प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. तसेच 8818 फेरीवाले, 4935 घुसखोर तर 777 उपद्रव करणाऱयांवर साल 2020 आणि 2021 मध्ये आतापर्यंत कारवाई करून त्यांच्याकडून आतापर्यंत 64 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) लोहमार्ग पोलिसांच्या (जीआरपी) सातत्याने मोहीम राबविल्याने आयपीसी कलम 392 जबरी चोरीचे गुन्हे गेल्या वर्षी (2020 एप्रिलपर्यंत) 126 गुन्हे होते ते यंदा (2021 एप्रिलपर्यंत) 46 इतके म्हणजे 63.5 टक्क्यांनी कमी झाले आहेत. रॉबरीचे गुन्हे उकल होण्याचे प्रमाण वाढले असून 2020 मध्ये 21.42 टक्के असलेले प्रमाण 2021 मध्ये 41.30 टक्के इतके वाढले आहे. स्टाफची स्थानकातील उपस्थिती आणि बंदोबस्तामुळे 2021 मध्ये एकही विनयभंगाची केस नोंद झाली नसल्याचे पश्चिम रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. पश्चिम रेल्वे आरपीएफचे महानिरीक्षक आणि प्रिन्सिपल चीफ सुरक्षा आयुक्त प्रवीण चंद्र सिन्हा यांनी बोरिवली स्थानकात भेट देऊन याबाबत आरपीएफ स्टाफचे काwतुक करीत महिलांच्या सुरक्षेसाठी असेच कार्यरत राहण्यास सांगितले.

























































