
व्यावसायिक वादातून एका तरुणाची हत्या तर दुसऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणात गुन्हे शाखा युनिट-7 च्या पथकाने भांडुप येथील कुप्रसिद्ध गुंड अमित भोगले याच्या मुसक्या आवळल्या आहेत. भोगलेच्या आलिशान गाडीत पोलिसांना देशी बनावटीचे लोडेट पिस्तूल सापडले, तर घराच्या बाजूला असलेल्या स्टोअर रूममध्ये एक पिस्टल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
ऑक्टोबर महिन्यात भांडुप परिसरात राहणाऱया दोघा तरुणांना सचिन आणि पीयूष या दोघांनी अडवले. त्यानंतर सुशील, उमेश व राहुल यांनी दोघांवर प्राणघातक हल्ला केला. त्यात सूरज मेहरा ऊर्फ नेपाळी याचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून भांडुप पोलिसांनी काही आरोपींना अटक केली.
दरम्यान, या गुह्यात भांडुप येथील कुप्रसिद्ध गुंड अमित भोगले याचादेखील समावेश असल्याची माहिती मिळताच प्रभारी निरीक्षक मनीश श्रीधनकर, सुधीर जाधव, उपनिरीक्षक रामदास कदम, अतिष लोहकरे व पथकाने शोध घेऊन भोगलेला पकडले. त्याला कोर्टात हजर केले असता 4 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.


























































