एनआयए करणार युरेनियम प्रकरणाचा तपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
NIA

एटीएसच्या नागपाडा युनिटने मानखुर्द येथे बेकायदेशीर साठा केलेला अत्यंत धोकादायक अशा नैसर्गिक युरेनियमचा सात किलो 100 ग्रॅम वजनाचा साठा पकडला होता. या प्रकरणाचा आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) पुढचा तपास करणार आहे.

नैसर्गिक युरेनियम हे अत्यंत धोकादायक व मानवी जीवितास हानीकारक आहे. हे ठाऊक असतानाही जिगर पंडय़ा आणि अबू ताहिर या दोघांनी मानखुर्द येथे युरेनियमचा साठा करून ठेवला होता. तब्बल सात किलो 100 ग्रॅम वजनाचे युरेनियम त्यांना पाच कोटी रुपयांना विकायचे होते. त्यासाठी ते ग्राहक शोधत होते. मात्र एटीएसचे उपमहानिरीक्षक शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष भालेकर व त्यांच्या पथकाने वेळीच पंडय़ा आणि ताहिर यांची माहिती काढून युरेनियमचा साठा जप्त केला होता. दरम्यान, एनआयएने हे प्रकरण आता आपल्याकडे तपासासाठी घेतले आहे. याप्रकरणी एनआयएने त्यांच्याकडे नव्याने गुह्याची नोंद केली आहे. अॅटोमिक एनर्जी अॅक्ट 1962 अन्वये या गुह्याची नोंद करून एनआयए पुढील तपास करणार आहे.