दादर रेल्वे पोलिसांनी केला खोट्या तक्रारीचा पर्दाफाश

crime

नागरिक पुन्हा मारतील या भीती पोटी कुर्ला-शीव रेल्वे स्थानका दरम्यान पाच जणांनी मारहाण करून लूटमार केल्याचा बनाव रचणाऱ्याचे दादर रेल्वे पोलिसांनी पितळ उघडे पाडले आहे. खोटी तक्रार दिल्या प्रकरणी त्याचा अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केला आहे.

दहा दिवसांपूर्वी दादर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. कुर्ला-शीव दरम्यान पाच जणांनी चॉपर, बांबूने मारहाण करून मोबाईल चोरून नेल्याचे दोघांनी पोलिसांना सांगितले. त्याची गंभीर दखल घेत तपासासाठी पथक तयार केली. वरिष्ठ निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश पोवार, उप निरीक्षक रवी धुळे, वसंत अडारी, खरात, गायकवाड, नरवडे, सोनावणे, शेटे,अरकट आदींनी तपास सुरु केला. कौशल्याचा वापर करून पोलिसांनी माहिती मिळवली. त्या दोघांना विश्वासात घेऊन चौकशी केली. तेव्हा खोटी तक्रारीचा प्रकार समोर आला. मूळचे चेन्नईचे रहिवासी असलेल्या दोघांना मुंब्रा येथे मारहाण झाली होती. मारहाणीनंतर त्या दोघांनी कळवा येथे प्राथमिक उपचार घेतले. आपण रुग्णालयात आहोत हे समजल्यास नागरिक पुन्हा मारतील अशी त्या दोघांना भीती होती. त्या दोघांना पुन्हा गावी जायचे होते. पण मारहाणीच्या जखमा दिसल्यास विचारणा होईल त्यामुळे त्या दोघांनी लूटमार करून मारहाण केल्याचा बनाव रचला.

जखमेवरून फिरली तपासाची चक्रे

जखमी असलेल्या दोघांच्या जखमा या जुन्या असल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. तोच धागा पकडत तपास पुढे नेला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेथे रक्ताचे दाग दिसून आले नाही. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. मात्र अशी तेथे घटना घडली नसल्याचे उघड झाले.

आपली प्रतिक्रिया द्या