नवी मुंबईतून ड्रग्ज तस्कराला अटक, तुरुंगातून बाहेर पडताच पुन्हा आला ड्रग्जच्या धंद्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

मली पदार्थाची तस्करी करणाऱया परदेशी नागरिकाविरोधात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी)ने कारवाई हाती घेतली आहे. एनसीबीने नवी मुंबई येथे कारवाई करून पॉल चिगबाटा नावाच्या पेडलरच्या मुसक्या आवळून त्याच्याकडून 474 ग्रॅम मेफ्रेड्रॉन आणि 38 ग्रॅम चरस जप्त केले.

नवी मुंबई येथून एकजण ड्रग्जचे रॅकेट चालवत असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्या माहितीनंतर एनसीबीने नवी मुंबईत सापळा रचत पॉलच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून 25 लाखांचे ड्रग्ज एनसीबीने जप्त केले. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची एनसीबी कोठडी सुनावली आहे. पॉल हा गेल्या चार वर्षांपासून मुंबईत ड्रग्जचा धंदा करत आहे. कपडय़ाच्या व्यवसायाच्या नावाखाली तो बिझनेस व्हिसावर मुंबईत आला होता. दोन वर्षांपूर्वी एनसीबीने पॉलला ड्रग्ज केसमध्ये अटक केली होती. त्याला दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.

नायजेरियनने कॅप्सूल गिळल्या…

शुक्रवारी एनसीबीने जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलजवळ सापळा रचला होता. तेव्हा एनसीबीच्या पथकाने एका नायजेरियनला पकडले असता त्याने कोकेनच्या कॅप्सूल गिळल्या. त्याला एनसीबीने उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल केले. जे. जे.च्या डॉक्टरांनी त्या नायजेरियनच्या पोटातून काही ड्रग्जच्या कॅप्सूल बाहेर काढल्या आहेत.