बेकायदा गोदामांवर विशेष पथकाची धाड पडणार, वाढत्या आग दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर महापौरांचा निर्णय

मुंबईतील आगीच्या वाढत्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीरपणे सिलिंडर, ज्वलनशील पदार्थांचा साठा करणाऱ्या ठिकाणांवर आता विशेष पथकाची धाड पडणार असून कठोर कारवाई केली जाणार आहे. खुद्द महापौर, पोलीस, जिल्हाधिकारी आदींच्या पथकाकडून ही धाड टाकली जाणार आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही माहिती दिली. मुंबईत गेल्या काही दिवसांत बेकायदा ठिकाणी आगी लागण्याचे प्रकार वाढल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाच्या पेंग्विन कक्षात आढावा बैठक पार पडली. यावेळी मुंबई शहर जिल्हाधिकारी अरुण अभंग, पश्चिम उपनगरे अप्पर जिल्हाधिकारी उद्धव घुगे, पूर्व उपनगरे अप्पर जिल्हाधिकारी तेजूसिंग पवार, आपत्कालीन उपायुक्त प्रभात रहांगदळे, पोलीस उपायुक्त चैतन्य एस., अग्निशमन अधिकारी (प्रभारी) हेमंत परब आदी उपस्थित होते.

 

आपली प्रतिक्रिया द्या