कुर्ल्यात इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल

515

मुंबईतील कुर्ला येथे एका इमारतीला भीषण आग लागल्याचे वृत्त आहे. बर्वे मार्गावरील मेहता बिल्डिंगला आग लागल्याचे समजते आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान या आगीत कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. आग लागल्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही आहे.

आपली प्रतिक्रिया द्या