फोन करा, फिरता कृत्रिम तलाव ‘आपल्या दारी’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, गणेश विसर्जन कृत्रिम तलाव अथवा पालिकेने उपलब्ध केलेल्या फिरत्या वाहनात करा, त्यासाठी पालिकेने उपलब्ध करून दिलेल्या नंबरवर फोन करा, असे आवाहन जी/उत्तर विभागाचे साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी केले आहे. याचा लाभ दादर, माहीम व धारावीकरांना होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, या वर्षी पालिकेने कृत्रिम तलाव व फिरता कृत्रिम तलाव या ठिकाणी बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करण्याची व्यवस्था केली आहे. पालिकेच्या 24 विभागात गाडयांवर फिरते कृत्रिम तलाव तयार करून त्यात गणपती विसर्जनाची व्यवस्था केली आहे.

022-24397888 हा नंबर फिरवा!

दादर, माहीम व धारावी परिसरात विसर्जनासाठी फिरत्या कृत्रिम तलावाची आवश्यकता असल्यास 022-24397888 या नंबरवर फोन करा, असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. सणासुदीच्या वेळी गर्दी होते. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी फिरत्या कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे.

जी/उत्तर विभागातील विसर्जन व्यवस्था

बाप्पाच्या दीड दिवसांच्या गौरी गणपतींचे विसर्जन आजपासून करण्यात येत आहे. त्यामुळे दादर, माहीम व धारावी या ठिकाणी बाप्पाच्या विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिका क्रीडा भवन, स्वातंत्र्यवीर सावरकर रोड, शिवाजी पार्क, जाखादेवी मंदिर गोखले रोड, डिसिल्व्हा हायस्कूल रानडे रोड, चौधरीवाडी एस.के.बोले मार्ग, माहीम, माटुंगाचार्य मैदान, माहीम कॉजवेजवळ, शिवाजी पार्क फायर ब्रिगेडजवळ, कोटणीस मार्ग, पारसी मैदान, धारावी पंपिंग मैदान, एन. शिवराज मैदान, 90 फुट रोड, शाहुनगर मैदान, वैभव आर्टमेंट धारावी, कुंभारवाडा, धारावी पोलीस ठाणे, शास्त्राrनगर, कल्पतरू अपार्टमेंट या ठिकाणी बाप्पाच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.