गँगस्टर प्रसाद पुजारीच्या आईला ‘मोक्का’खाली अटक

227

विक्रोळीतील बांधकाम व्यावसायिकाला 10 लाखांच्या खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी गँगस्टर प्रसाद पुजारी याच्या आईलाच मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-7 ने ‘मोक्का’ कायद्याखाली अटक केली. इंदिरा विठ्ठल पुजारी (62) असे तिचे नाव आहे. प्रसाद पुजारी याने विक्रोळीतील बांधकाम व्यावसायिकाकडे दहा लाखांची खंडणी मागितली होती. पण व्यावसायिक दाद देत नसल्यामुळे पुजारीने गुंडांकरवी विक्रोळी परिसरातील शिवसेना उपविभागप्रमुखावर प्राणघातक हल्ला केला होता. त्यानंतर गुन्हे शाखेचे प्रभारी निरीक्षक सतीश तावरे व त्यांच्या पथकाने तत्काळ तपास करीत गोळीबार केल्या प्रकरणात सुनील अनगणे याला अटक केली. तपासादरम्यान पुजारीचा मावसभाऊ सुकेश कुमार (28) याला अटक केली. सुकेशने सुनीलच्या बँक खात्यात पैसे भरल्याचे समोर आले होते. पुजारीची आई इंदिरा हिने हे पैसे पुरवल्याचे चौकशीतून पुढे आल्याने तिला अटक करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या