गणेशमूर्तींचे विसर्जन समुद्रातही करता येणार; बंदी नसल्याचे पालिकेचेस्पष्टीकरण

242

कोरोनाच्या प्रभावामुळे या वर्षी पालिकेच्या माध्यमातून गणेशमूर्ती विसर्जनासाठी तब्बल 167 कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. मात्र समुद्रापासून जवळ असणाऱयांना मूर्तींचे विसर्जन समुद्रातही करता येणार आहे. समुद्रात मूर्ती विसर्जन करण्यास बंदी नसल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी पालिकेच्या माध्यमातून विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. यात गणेशोत्सवात गर्दी टाळण्यासाठी गणेशमूर्ती आगमन, विसर्जन मिरवणुकीला बंदी घालण्यात आली आहे. शिवाय मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या पाच पटींनी वाढवून 167 करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या