क्रेन मिळत नसल्याने कंटेनर नदीतच, महामार्गावर वाहनांच्या रांगा

मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी पुलावरून कंटेनर नदीत कोसळला. कंटेनर मधील गॅस लिकेज झाला असून गेले 24 तास पुलावरील वाहतूक ठप्प आहे. क्रेन मिळत नसल्यामुळे नदीत पडलेला कंटनेर अद्याप काढता आलेला नाही. दरम्यान महामार्गावरील हलक्या वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. अवजड वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

गुरूवारी गोव्याच्या दिशेने गॅस वाहतूक करणारा कंटेनर टॅंकर आज गुरुवारी गोव्याच्या दिशेने जात असताना मुंबई-गोवा महामार्गावर आंजणारी येथील पुलाचा कठडा तोडून हा कंटेनर थेट काजळी नदी जाऊन कोसळला. या भीषण अपघातामध्ये चालक हा कंटेनर खाली अडकून पडल्याने त्याचा पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाला.