बॉयफ्रेंड विरोधात बलात्काराची खोटी तक्रार; हायकोर्टाने ठोठावला महिलेला 25 हजारांचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-high-court

बॉयप्रेंडवर बलात्काराचा आरोप करत त्याच्या विरोधात खोटी तक्रार दाखल करणाऱ्या महिलेला मुंबई उच्च न्यायालयाने 25 हजाराचा दंड ठोठावत चार आठवडय़ाच्या आत हे पैसे मुंबई पोलीस केल्फेअर फंडात जमा करण्यास बजावले.

बॉयप्रेंडने गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा दावा करत या महिलेने नालासोपारा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. त्यानंतर गेल्या महिन्यात तिने सदर एफआयआर रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली. पालकांच्या दबावाखाली एफआयआर दाखल केल्याचे तिने न्यायालयाला सांगितले. मात्र सरकारी वकील कामत यांनी कोर्टाला सांगितले की, पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून कोर्टाने एफआयआर रद्द करण्यास नकार दिला तर मोठा दंड महिलेला भरावा लागेल.