
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावात देशाताल ऑक्सिजनची टंचाई दूर करण्यासाठी आयआयटी मुंबईने पुढाकार घेतला आहे. पीएसए (प्रेशर स्विंग एबसॉरप्शन) नायट्रोजन युनिटचे पीएसए ऑक्सिजन युनिटमध्ये रूपांतरण करणारी यंत्रणा आयआयटी मुंबईच्या टीमकडून तयार करण्यात आली आहे. प्राथमिक चाचण्यांमध्ये या प्रकल्पाचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. 3.5 एटीएम इतक्या दाबाने 93 ते 96 टक्के शुद्धतेच्या स्तरासह ऑक्सिजनची निर्मिती शक्य होणार आहे.
अकोला जिल्हय़ाला मोठा दिलासा
देशातील ऑक्सिजन तुटवडा दूर करण्यासाठी रेल्वेने सुरू केलेल्या ‘ऑक्सिजन एक्प्रेस’मुळे अकोल्यातील अनेक रुग्णालयांना मोठा दिलासा मिळाला आहे. या एक्प्रेसमुळे येथील काही रुग्णालयांना वैद्यकीय ऑक्सिजन मिळाला असून जिह्यातील ऑक्सिजनची कमतरता दूर होण्यास मदत मिळाली आहे. या एक्प्रेसमुळे सुमारे 10 मेट्रिक टन इतका ऑक्सिजनचा हा साठा उपलब्ध झाला आहे. त्यापैकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाला 6 मेट्रिक टन आणि उर्वरित 4 मेट्रिक टन साठा मूर्तिजापूर येथील शासकीय रुग्णालयाला देण्यात आला आहे.
नागपुरात ऑक्सिजनची कमतरता दूर होणार
नागपूर शहरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता 200 व्हेंटिलेटर आले असून लवकरच 500 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसुद्धा येणार असून या सर्वांचे वितरण ग्रामीण विदर्भात होणार आहे. यामुळे वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, असे गडकरींनी स्पष्ट केले. ऑक्सिजन वाहतुकीसाठी विदेशातून क्रायोजेनिक पंटेनर खरेदी करण्याचे प्रस्तावित असून 3,000 सिलिंडर खरेदी करून ते विदर्भात वितरित करण्यात येतील, अशी ग्वाही पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
































































