
सामना ऑनलाईन । मुंबई
बेल्जियमहून आपल्या पत्नीला सरप्राइज देण्यासाठी आलेलेल्या आयटी इंजिनिअरचा इमारतीच्या ६ व्या मजल्यावरून पडुन दुर्दैवी मृत्यु झाला आहे. तेजस दुबे (३२) असं या आयटी इंजिनिअरचे नाव असून पूण्यात राहण्याऱ्या पत्नीला तिच्या वाढदिवशी भेटण्यासाठी तो बेल्जियमहून मुंबईला आला होता. मात्र पूण्यात जाण्याअगोदर सांताक्रूज येथेली मित्राच्या घरी आराम करण्यासाठी गेला आणि तिथेच घात झाला.
मुळचा झारखंडचा असतलेला तेजस नोकरी निमित्त बेल्जियमला असायचा व त्याची पत्नी पत्नी पुण्यात राहत होती. तो अधुन मधुन पत्नीला भेटायला येत असे. गुरुवारी रात्री देखील तो पत्नीला तिच्या वाढदिवसानिमित्त सरप्राईज देण्यासाठी बेल्जियामहुन मुंबईत आला. विमानतळावरून तेजस रोहित या मित्राच्या घरी गेला, तेथून इतर मित्रांसोबत पत्निच्या वाढदिवसानिमित्त पुण्याला जाणयाचा बेत त्यांनी आखला होता.
रोहित सांताक्रूज पुर्वेच्या सेंट रॉक चर्च जवळील पीके आर्च बिल्डिंगमध्ये सहाव्या मजल्यावर भाड्याने राहतो. मित्रांसोबत गप्पा गोष्टी झाल्यानंतर शुक्रवारी पहाटे ५.३० च्या सूमारास तेजस बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेला आणि त्याचवेळी बेडरूमधील खिडकीतून खाली कोसळला. यावेळी बिल्डिंगच्या वॉचमनच्या लभात आल्याने त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यु झाला होता.
तेजस झोपण्यासाठी गेलेल्या खोलीतील खिडकी फ्रेंच विंडो होती म्हणजे या खिडकीला ग्रील्स नव्हते. तेजसने सलग १२ ते १४ तास विमान प्रवास केल्याने त्याची झोप पुर्ण झाली नव्हती, त्यामुळे झोपेतच त्याचा तोल जाऊन हा अपघात घडल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांनी सांगीतले आहे.
दरम्यान, या प्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढिल तपास सुरु आहे.



























































