
उपनगरीय मार्गावर धावणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये चणे, शेंगदाण्यांपासून वेगवेगळ्या वस्तू विकून आपले पोट भरणारे फेरीवाले आता अधिकृत होणार आहेत. लोकल ट्रेनसह लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये सध्या बेकायदेशीरपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना अधिकृत परवाना देण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने घेतला असून त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलने दररोज 40 लाखांहून अधिक प्रवास करतात. तसेच लांब पल्ल्याच्या गाडय़ांनी प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. सध्या ट्रेनमध्ये कोणत्याही परवान्याशिवाय फेरीवाले खाद्यपदार्थ, वस्तू विकण्याचा व्यवसाय करतात. त्यामुळे रेल्वेला कोणताही महसूल मिळत नसून बेकायदेशीरपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांचा प्रवाशांनाही नाहक त्रास होतो. त्याची दखल घेत रेल्वेने लोकल ट्रेनमध्ये व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना अधिकृत परवाना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उपनगरीय मार्गावर 1500 आणि मेल एक्सप्रेसमध्ये 500 विव्रेत्यांना तीन वर्षासाठी अधिकृत परवाना दिला जाणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या महसुलातही भर पडणार आहे.
परवानाधारकांना विव्रेत्यांना प्रवाशांशी संबंधित उत्पादने, मोबाईल, लॅपटॉपसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, स्टेशनरी उत्पादने, वृत्तपत्र, मासिके, पुस्तके, पॅक केलेले अन्नपदार्थ, पेय विक्री करण्याची परवानगी दिली जाणार आहे.
एसी लोकलमध्ये परवानगी
सध्या साध्या लोकलमध्ये विव्रेत्यांचा वावर दिसत असला तरी एसी लोकलमध्ये ते दिसत नाहीत. कोणी आढळल्यास रेल्वेकडून त्यांच्यावर कारवाई केली जाते. मात्र नुकत्याच काढलेल्या निविदांमध्ये अधिकृत परवाना घेतलेल्या विव्रेत्यांना एसी लोकल ट्रेनमध्येही आपल्या वस्तूंची विक्री करता येणार असल्याचे म्हटले आहे.




























































