मुंब्र्यात लोकलचा डबा फलाटाला घासला, मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती शिवाजी टर्मिनस ते टिटवाळा या लोकलचा डबा मुंब्रा स्थानकात फलाटाला घासत गेल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर प्रवाशांना फलाटावर उतरवून परिस्थिती पूर्ववत करण्यात आली या मुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पावसामुळे रुळालगतचा भाग किंचित खचल्याने ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

 

मुंब्रा स्थानकात फलाट क्रमांक १ येथे सीएसएमटी ते टिटवाळा स्लो लोकल बुधवारी रात्री ९.४५ वाजता आली आणि स्थानकात पोहोचतात ही लोकल प्लॅटफॉर्मला घासत चिकटल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर रेल्वे मधील प्रवाशांना तात्काळ उतरण्यात आले. ९.५३ वाजता परिस्थिती पूर्ववत करून गाडी पुढें सोडण्यात आली.