लोढा प्रिमिएरा वसाहतीतील लसीकरण केंद्रास पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील लोढा प्रिमिएरा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने तेथील रहिवाशांसाठी कोरोना लसीकरण अभियान राबविण्यात आले. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या केंद्रास भेट देऊन पाहणी केली.

सुराणा ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या लसीकरण अभियानात वसाहतीतील सुमारे 400 रहिवाशांना लस दिली जाणार आहे. या अभियानाबाबत समाधान व्यक्त करून कोविड 19 बाबतचे सर्व नियम पाळण्याची सूचना  ठाकरे यांनी यावेळी केली. माजी मंत्री सचिन अहिर यावेळी उपस्थित होते.