
मुंबईत आज दिवसभरात 654 कोरोना रुग्णांची नोंद झाली तर दिवसभरात 472 जण कोरोनामुक्त झाले. दरम्यान, मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 364 दिवसांवर पोहोचला आहे.
मुंबईतील विविध रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेल्या आणि दीर्घकालीन आजार असणाऱ्या 9 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या 11 हजार 171 वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या 2 लाख 77 हजार 664 वर पोहोचली आहे.
कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 93 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 364 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या 7 हजार 972 वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 24 लाख 63 हजार 249 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 2 लाख 97 हजार 638 वर पोहोचली आहे.
राज्यात दिवसभरात 2,890 जण कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवर
कोरोनाविरोधात महाराष्ट्रभरात राबवण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला चांगले यश आले असून राज्यात आज दिवसभरात 2 हजार 890 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रिकव्हरी रेट 94.75 टक्क्यांवर पोहोचला आहे तर 3 हजार 693 कोरोना रुग्णांची नोंद झाली.
कोरोना पार्श्वभूमीवर, राज्यभरात सरकार आणि नगरपालिका, महानगरपालिकेकडून कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आज दिवसभरात कोरोनामुळे 73 जणांचा मृत्यू झाला तर मृत्यूदर 2.55 वर आला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या 1 कोटी 32 लाख 67 हजार 917 चाचण्या झाल्या असून 19 लाख 61 हजार 975 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात सध्या 2 लाख 42 हजार 585 जण होम क्वारंटाइन असून 3 हजार 15 जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.





























































