
मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेत एका महिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. संरक्षक जाळीमुळे या महिलेचा जीव वाचला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेचे नाव प्रियांका गुप्ता आहे. ती उल्हासनगर येथे राहणार आहे. दरम्यान, या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला हे अद्याप कळू शकलेले नाही आहे. पोलीस याबाबत अधिक चौकशी करत आहेत. यापूर्वीही मंत्रालयातून आत्महत्या करण्याचे प्रयत्न झाले होते. त्यामुळेच तेथे संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या आहेत.


























































