मुलुंडमध्ये भिंत कोसळून एक ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुलुंडमध्ये घरावर भिंत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला. मुलुंड पश्चिम येथील एल. बी. एस. मार्गावर असलेल्या कल्पादेवी पाडा येथे संध्याकाळी साडेसात वाजता ही घटना घडली. कंपाऊंडची भिंत एका घरावर कोसळली. या दुर्घटनेत दिलीप वर्मा (35) हे जबर जखमी झाले. पालिकेच्या अगरवाल रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.