
कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ ही राज्य सरकारची मोहीम महत्त्वपूर्ण ठरत आहे. हाच विषय घेऊन युवा सेनेने लघुपट (शॉर्ट स्टोरी) स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांचा रोख पारितोषिके देऊन गौरव केला जाणार आहे.
युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून विनाशुल्क आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱया स्पर्धकांना तीन मिनिटांचा लघुपट बनवावा लागेल. लघुपटासाठी मोबाईल पह्न किंवा कॅमेऱयाद्वारे चित्रीकरण करता येईल. व्हिडीओचा आवाज उत्तम दर्जाचा असावा असे आयोजकांनी सांगितले आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश स्वीकारण्याची तारीख 25 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाला 50 हजार, द्वितीय क्रमांकाला 30 हजार आणि तृतीय क्रमांकाला 20 हजार रुपये पारितोषक देण्यात येणार आहे.
स्पर्धेचे प्राथमिक परीक्षक अभिनेता मिलिंद गवळी, दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर, रवींद्र करमरकर, अभिनेता प्रदीप वेंगुर्लेकर तर अंतिम परीक्षक दिग्दर्शक-अभिनेते सुबोध भावे, सिनेमॅटोग्राफर-दिग्दर्शक महेश लिमये, लेखक-दिग्दर्शक अजित भुरे हे असतील. स्पर्धेचा निकाल 31 ऑक्टोबर 2020 रोजी जाहीर करण्यात येईल. अधिक माहितीसाठी आयोजक अमोल परब यांच्याशी 9870549863/8988987172 या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


























































