जनसुरक्षा विधेयकावर 12 हजार हरकती

राज्यघटनेने नागरिकांना आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. नक्षली कारवाया रोखण्याच्या निमित्ताने तो अधिकारच हिरावून घेऊ पाहणाऱ्या जनसुरक्षा विधेयकावर हरकतींचा पाऊस पडला आहे. या विधेयकासाठी नेमलेल्या संयुक्त निवड समितीकडे आतापर्यंत 12 हजारांवर हरकती आणि सूचना मिळाल्या आहेत. महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक म्हणजेच जनसुरक्षा विधेयक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात मांडले होते. विधेयकाला विरोधी पक्षाने कडाडून विरोध दर्शवला.